वाळूज : डोक्‍यात फरशी पडल्याने कामगाराचा मृत्यू

आर. के. भराड
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

लोकेश ग्रेनाईट कंपनीतील घटना

वाळूज (जि. औरंगाबाद) - सहकाऱ्यांसोबत काम करीत असताना एका कामगाराच्या डोक्‍यात फरशी पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाळूज परिसरातील फरशी कंपनीत गुरुवारी (ता. तीन) सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास घडली. चंद्रभान भिकाजी साळवे (वय 50, रा. काशीनगर, कांचनवाडी) असे मृताचे नाव आहे. 

वाळूज परिसरातील एएस क्‍लबजवळ असलेल्या प्लॉट क्रमांक 30 ए येथील लोकेश ग्रेनाईट या फरशीच्या कंपनीत साळवे हे तीन सहकारी कामगारांबरोबर तीन महिन्यांपूर्वी कामाला लागले होते. गुरुवारी सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास तो काम करीत असताना त्याच्या डोक्‍यात अचानक फरशी पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला नरेश शर्मा व रंगनाथ भालेराव यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान दीडच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस हवालदार एस. जी. जोगस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worker's death at waluj