जागतिक थॅलेसेमीया दिवस : परभणी जिल्ह्यात या आजारास अटकाव; गतवर्षी केवळ चार मेजर बालकांचाच जन्म

मिशन 2020 व्हिजन 2025 ह्या मोहिमेच्या माध्यमातून 2025 पर्यंत एकही थॅलेसेमीया मेजर बालकांचा जन्म होणार नाही. हे ध्येय समोर ठेवून जनजागृतीचे काम चालू आहे.
thalessemia
thalessemia

परभणी ः थॅलेसिमिया या आजाराचे (Thalessemia)नाव जरी निघाले तरी नवजात शिशुंच्या (child)पालकांच्या ह्रदयात धडकी बसते. या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना महिण्यातून दोन वेळा रक्त बदलावे (blood change) लागते. परंतू या आजाराला अटकाव करण्यासाठी गेल्या सहा वर्षापासून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचे चांगले फलित पहावयास मिळाले. गतवर्षी जिल्हयात केवळ चार थॅलेसिमियाग्रस्त बालकांनी जन्म घेतला. थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून (Parbhani suport group) या जनजागृतीचे काम केले जाते. World Thalassemia Day: Prevention of the disease in Parbhani district; Only four major babies were born last year

मिशन 2020 व्हिजन 2025 ह्या मोहिमेच्या माध्यमातून 2025 पर्यंत एकही थॅलेसेमीया मेजर बालकांचा जन्म होणार नाही. हे ध्येय समोर ठेवून जनजागृतीचे काम चालू आहे. थॅलेसेमीया रक्ताचा गंभीर आजार आहे. यात जन्माला आल्यापासून साधारणपणे एक वर्षचे आत या आजाराचे निदान होते. त्यावेळेपासून सदर बाळाचे दर पंधरा दिवसाला रक्त बदलावे लागते. तरच बाळ जिवंत राहू शकते. असे बाळ जन्माला येऊ नये या करिता लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सहा वर्षापूर्वी थॅलेसेमीया सपोर्ट ग्रुपची स्थापना करून महाविद्यालयीन विध्यार्थीमध्ये या आजराबाबत जनजागृती सुरु केली. लग्नापूर्वीच प्रत्येकाने आपली थॅलेसेमीया तपासणी करणे का गरजेचे आहे या संदर्भात माहिती दिली.

हेही वाचा - नांदेड : रोहीपिंपळगावात सामाजिक शांतता कायम राखा- प्रमोदकुमार शेवाळे

महाराष्ट्रातील आजच्या घडीला एकमेव ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांचे मार्गदर्शनात आर. बी. एस. के. च्या मेडिकल ऑफिसर डॉ. अर्चना भायकर यांनी स्वयंस्फुर्त पुढाकार घेऊन गेल्या दीड वर्षपासून जिंतूर तालुक्यातील 22 बालकांना नियमितपणे रक्तसंक्रमन, रक्तविकार तज्ञामार्फत बालकांची तपासणी करून या बालकांचे आयुष्यमान या कठीण काळात उंचावणे करिता संपूर्ण महाराष्ट्र समोर आदर्श ठेवला आहे.

परभणी जिल्ह्यात १२५ बालके

परभणी जिह्यातील 125 बालके ह्या आजाराने ग्रस्त आहेत. ज्यांना महिन्यातून दोन वेळेस रक्तसंक्रमन करावे लागते. 5 ते 6 हजाराची औषधे लागतात. सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून शासन पातळीवर प्रयत्न करून या वर्षी सहा जिल्ह्यातील बालकांना ही औषधे मोफत देण्यात आली. टाळेबंदीच्या काळात सर्व खाजगी वाहतूक बंद असल्याने बालकांना रक्तसंक्रमन करिता जिल्हा रुग्णालयात येणारी अडचण लक्षात घेऊन तालुकास्तरावर या बालकांचे रक्तसंक्रमन करण्यात येत आहे.

टाळेंबदीत रक्त कमी पडले नाही

18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रम जाहीर झाला. पण लसीकरण नंतर 28 दिवस रक्तदान करता येत नाही. या बाबीचा विचार करून परभणी येथील अभिषेक वाकोडकर या युवकाने पुढाकार घेऊन रामकृष्ण नगर नगर येथे सलग तीन दिवस रक्तदानशिबिराचे आयोजन केले. त्यामुळे थॅलेसेमिया बालकांना टाळेबंदी व कोविडंची झळ पोहचली नाही. प्रतिकारशक्ती खूपच कमी असूनही एकही थॅलेसेमी बालकास कोविडंची लागण झाली नाही.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com