Government School : कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत दिलेल्या मिलेट्सयुक्त चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्याने पालक संतप्त झाले. त्यांनी हा मुद्दा शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणला.
कळंब (जि. धाराशिव) : राज्य शासनाकडून मध्यान्ह भोजन योजनेतून शालेय पोषण आहारासह मिलेट्सयुक्त चॉकलेट पुरविले जातात. हे चॉकलेट तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांत वितरित करण्यात आले आहेत.