चिंताजनक : हिंगोलीत सोमवारी रात्री नव्याने १७ कोरोना रुग्णांची भर, सहा रुग्णांची सुट्टी

file photo
file photo
Updated on

हिंगोली : जिल्ह्यात प्राप्त आकडेवारीनुसार सोमवारी (ता. २७) रात्री नव्याने एकूण १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. तर सहा रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यन्त जिल्ह्यात सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाकडून सोमवारी रात्री साडेदहा वाजता प्राप्त अहवालानुसार सहा कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. यामध्ये एक रुग्ण औंढा तालुक्यातील अंजनवाडी सेंटर येथील आहे. तर पाच रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयातील असून यात चार वसमत येथील शुक्रवार पेठ येथील असून एक नारायणनगर हिंगोली येथील आहे.

 हिंगोली जिल्ह्यात १७ नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले 

आज रोजी हिंगोली जिल्ह्यात १७ नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. यामध्ये हिंगोली गाडीपुरा येथील तीन रुग्ण असून, यात १६ वर्षाची मुलगी, ४८ व २५ वर्ष वयाची महिला यांचा समावेश आहे. तर मेहराज कॉर्नर येथील एका ५५ वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. याचप्रमाणे आझम कॉलनी येथील ५० वर्ष वयाचा पुरुष, मंगळवारा येथील तिघे जण आहेत यात २६ पुरुष, २४, १९ वर्षीय महिला आहे. तसेच एसआरपीएफ येथील चार जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये ३१, ३३, ४१, ३० वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. वसमत येथील दोघे असून यात सोमवार पेठ येथील एका २७ वर्षाचा पुरुष तर पठाण मोहल्ला येथील एका १९ वर्षाच्या महिलेचा समावेश आहे.

सद्यस्थितीला ५८२ व्यक्ती भरती आहेत

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ५७५ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ३७२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला एकूण १९७ रुग्णांवर उपचार चालु आहेत. हिंगोली जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकूण ७१६७ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ६६७९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ६५५६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीला ५८२ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी २४६ अहवाल येणे, स्वॅब घेणे प्रलंबित आहे. आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latur Usmanpura Fight Incident Parli Youth Dies Two Seriously Injured Police Probe Continues Into the Dispute
Paithan Godavari River Rescue Three Women Saved From Drowning by Two Young Men Who Showed Courage and Quick Thinking
Pune Beed Direct Railway Service Timetable Announced Train To Cover Journey In Seven Hours With Multiple Station Stops
Manoj Jarange Patil Hunger Strike Ends In Patoda Mumbai Protest Put On Hold Government Gets Three Months For Maratha Demands
Marathi News Esakal
www.esakal.com