चिंताजनक ; हिंगोलीत नव्याने ८० रुग्ण वाढले तर १५ रुग्णांना सुट्टी

राजेश दारव्हेकर
Sunday, 13 September 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शनिवारी प्राप्त झालेल्या  अहवालानुसार  आरटीपीसीआर तापसणीत ६२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात शनिवारी (ता. १२)  नव्याने ८० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यातील ६२ रुग्ण हे आरटीपीसीआरटी तापसणीत आढळून आले आहेत .तर १८ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. १५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शनिवारी प्राप्त झालेल्या  अहवालानुसार  आरटीपीसीआर तापसणीत ६२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर २५,वसमत परिसर पाच, कळमनुरी परिसर ३२ असे एकूण ६२ रुग्ण आढळून आले आहेत.सर्वाधिक रुग्ण कळमनुरी तालुक्यात आढळून आल्याने हा परिसर हॉटस्पॉट झोन झाला आहे. तर रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकूण १८ रुग्ण सापडले असून, यात हिंगोली परिसरातील १८ रुग्ण असून, यामध्ये नामदेवनगर ,हनुमान नगर, गवळीपुरा ,श्रीनगर, एनटीसी ,आदीचा समावेश आहे. तर आज १५  रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील पाच ,कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथील दहा असे एकूण १५  रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

हेही वाचा - धक्कादायक : तुरीच्या शेतात गांजा, एटीसी आणि कुरुंदा पोलिसांची कारवाई

कोरोना रुग्णांपैकी २५ रुग्णांची प्रकृती गंभीर

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी २५ रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या पाच  रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण ३० रुग्णांची  प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण २०७० रुग्ण झाले असून, त्यापैकी १५७५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण ४७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ.किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worrying; In Hingoli, 80 new patients were added and 15 patients were discharged hingoli news