माणुसकीला काळिमा, विवाहितेच्या मृतदेहावरील दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

बीड येथील जिल्हा रुग्णालयात मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार उघडकीस आला. एका विवाहितेच्या मृतदेहावरील दागिने लंपास झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांत दिली आहे. 

बीड - काही डॉक्‍टरांची मनमर्जी, कर्मचाऱ्यांकडून रुग्णांसह नातेवाइकांना अरेरावी, बाळंत रुग्णांकडून पैसे मागणे अशा प्रकारांची नेहमी चर्चा होणाऱ्या जिल्हा रुग्णालयात आता कहरच झाला आहे. चक्क मृतदेहाच्या शरीरावरील दागिने शवविच्छेदनगृहातून लंपास झाल्याचा प्रकार सोमवारी (ता. 16) समोर आला. "मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे' या म्हणीचा प्रत्ययच या प्रकारातून दिसून आला. 

शहरातील पंचशीलनगरमधील निकिता गणेश शिंदे या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी या महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणून शवगृहात ठेवण्यात आला. दरम्यान, महिलेचे माहेरकडील नातेवाईक मुंबईला राहत असल्याने त्यांना येईपर्यंत उत्तरीय तपासणी करू नये, असे नातेवाइकांचे म्हणणे होते.

क्‍लिक करा : ऑनलाईन नोकरीच्या अमिषाने गंडा 

त्यामुळे शवगृहाला कुलूप लावून ठेवले. नंतर एका दुसऱ्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी शवगृह उघडून नंतर पुन्हा कुलूप लावण्यात आले. मात्र, सायंकाळी मृत निकिता शिंदे हिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास असल्याचे समोर आले. तशी लेखी तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. अगोदरच काही घटकांनी बदनाम केलेल्या जिल्हा रुग्णालयात आता मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार घडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrap jewelry on the bride's dead body

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: