येडेश्वरी देवीच्या यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थिती

संतोषकुमार जाधवर
शनिवार, 31 मार्च 2018

येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त शनिवारी पहाटे देवीच्या मूर्तीला अभिषेक केल्यानंतर दर्शनास सुरवात झाली. सकाळी  अकरापर्यंत सुमारे तीन लाखांपेक्षाही अधिक भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते. 

येरमाळा : लाखो भाविकांच्या उपस्थितीत येरमाळा (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेला शनिवारी (ता. ३१) पहाटेपासून सुरवात झाली.

येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त शनिवारी पहाटे देवीच्या मूर्तीला अभिषेक केल्यानंतर दर्शनास सुरवात झाली. सकाळी  अकरापर्यंत सुमारे तीन लाखांपेक्षाही अधिक भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते. 

येडेश्वरीच्या देवीच्या चैत्री यात्रेला शनिवारी प्रारंभ झाला. यात्रेमुळे शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळपासूनच भाविक येरमाळा येथे दाखल होण्यास सुरवात झाली होती. शनिवारी सकाळपासून भाविकांचा ओघ सुरू होता. रविवारी (ता. एक) चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम असून, या कार्यक्रमाला दहा लाखांच्या जवळपास भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाविकांच्या गर्दीमुळे येडेश्‍वरी मंदिराचा परिसर  भाविकांनी गजबजून गेला असून, सर्वत्र आई राजा उदो उदोचा जयघोष सुरू होता. आराधी मंडळे, भाविक आपल्या खासगी वाहनातून देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे भाविकांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Yedeshwari Devi Yatra in Yermala