येरमळ्यात लाखो भाविकांनी वेचली चुनखडी

संतोषकुमार जाधवर
रविवार, 1 एप्रिल 2018

येडेश्वरी देवीच्या यात्रेतील मुख्य दिवस रविवारी होता. आई राजा उदो उदोचा जयघोष करीत सकाळी आठच्या सुमारास देवीच्या पालखीचे मुख्य मंदिरातून आमराईकडे प्रस्थान झाले. यावेळी मानकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येरमाळा : येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेत रविवारी (ता. एक) आई राजा उदो उदोच्या जयघोषात लाखो भाविकांनी चुनखडीच्या रानात पालखी दाखल झाल्यानंर चुनखडी वेचली. यावेळी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

येडेश्वरी देवीच्या यात्रेतील मुख्य दिवस रविवारी होता. आई राजा उदो उदोचा जयघोष करीत सकाळी आठच्या सुमारास देवीच्या पालखीचे मुख्य मंदिरातून आमराईकडे प्रस्थान झाले. यावेळी मानकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी दर्शनासाठी नैवेद्य घेऊन उभ्या असलेल्या भाविकांना दर्शन देत सकाळी दहाच्या सुमारास पालखीचे बाजार चौकात आगमन झाल्यानंतर सुभाष पाटील, अंकुश पाटील, अमोल पाटील, यशवंत पाटील, सरपंच विकास बारकूल आदींनी पालखीचे पुष्पहार घालून स्वागत केले.

त्यानंतर पालखी मुख्य कार्यक्रमासाठी चुनखडीच्या रानात पोचली. तेथे जवळपास १० लाख भाविक दाखल झाले होते. पालखी चुनखडीच्या रानात पोचल्यानंतर पालखीवर हॅलिकॉप्टरमधून  पुष्पवृष्टी करण्यात आली. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा यावर्षीचा पहिला मान लहूआप्पा बांगर व लालासाहेब बारकुल या भाविकांना मिळाला. पालखी मार्गावर विविध ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Yedeshwari yatra in Yermala