Parbhani: येहळेगाव ते निशाणा मार्ग बनला जीवघेणा; रस्त्यावर खड्डेच खड्डे, वाहनचालकांचे हाल; १५ गावांना जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था

Yehalegaon–Nishana Road Turns Dangerous: औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव (सोळंके) ते निशाणा मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि पुलाची दुरवस्था यामुळे १५ गावांतील नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
Parbhani

Parbhani

esakal

Updated on

येहळेगाव (सोळंके): औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव (सोळंके) ते निशाणा हा परिसरातील महत्त्वाचा संपर्क मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी व चिखल साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण पूर्णपणे उखडल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com