Yeldari Dam: सिद्धेश्वर धरण १०० टक्के भरले; १२ दरवाजे उघडून १२,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग
Purna River: येलदरी धरणाचे चार दरवाजे आणि सिद्धेश्वर धरणाचे बारापैकी बारावे दरवाजे उघडले आहेत. पूर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पूराची शक्यता वर्धित झाली आहे.
हिंगोली : जिल्ह्याच्या सीमेवर असलेले येलदरी धरण भरल्याने धरणाचे चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग होत आहे तर औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण १०० टक्के भरले असून या धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत.