येलदरी धरणाचे सर्वच दरवाजे उघडले; ३२,७६८ क्युसेक्स विसर्ग सुरु

जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे सोमवारी सायंकाळी साडेचार पर्यंत सर्वच म्हणजे दहाही दरवाजे उघडण्यात आले.
Yeldari Dam water discharge
Yeldari Dam water dischargeSakal
Summary

जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे सोमवारी सायंकाळी साडेचार पर्यंत सर्वच म्हणजे दहाही दरवाजे उघडण्यात आले.

जिंतूर - तालुक्यातील येलदरी धरणाचे सोमवारी सायंकाळी साडेचार पर्यंत सर्वच म्हणजे दहाही दरवाजे उघडण्यात आले. त्याद्वारे ३०,९६८ व वीजनिर्मितीद्वारे १,८०० असा एकूण ३२,७६८ विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

सोमवारी वरच्या भागातील पूर्णा प्रकल्पाचे टप्याटप्याने सायंकाळी चार पर्यंत १९ पैकी नवू दरवाजे ०.८० मीटर आणि १० दरवाजे अर्धा उघडून ४४,४०८.४८ क्युसेक्स विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडला. त्यामुळे गेल्या कांही दिवसांपासून या प्रकल्पातून पूर्णेच्या पात्रात सोडण्यात येत असलेल्या विसर्गात मोठी वाढ झाली. परीणामी येलदरी धरणाच्या जलाशयातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरण अगोदरच पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरलेले असल्याने अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी सोमवारी सकाळी येलदरी धरणाचे आणखी दोन दरवाजे अर्धा मीटर पर्यंत उचलण्यात आले होते.

परंतु जलाशयातील पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने सायंकाळी साडेचार पर्यंत तीन टप्प्यांत सर्वच दारे उघडावी लागली. यामध्ये एक,पाच, सहा व दहा क्रमांकाचे दरवाजे प्रत्येकी एक मीटर आणि उर्वरित क्रमांकाचे दरवाजे अर्धा मीटर उघडण्यात आले. सर्व दरवज्याद्वारे ३०,९६८ आणि वीजनिर्मिती द्वारा १८०० याप्रमाणे एकूण ३२,७६८ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

दरम्यान, धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असा येलदरी धरण, पूर नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com