Yeldari Dam: येलदरी धरण धोक्याच्या पातळीवर; १८०० क्युसेक पाणी विसर्गामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Purna River: येलदरी धरणाची पाणीपातळी धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली असून, जलविद्युत केंद्रातून १८०० क्युसेक विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे जलाशयात पाण्याची भर वाढत आहे.
जिंतूर : तालुक्यातील येलदरी धरणाच्या जलसाठ्याने धोक्याची पातळी गाठल्याने येथील जलविद्युत निर्मिती केंद्रातील दोन विद्युत जनित्र कार्यान्वित करून त्याद्वारे पूर्णा नदीच्या पात्रात १८०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.