
जिंतूर : तालुक्यातील येलदरी येथील जलविद्युत निर्मिती केंद्राने तीन ते १८ मार्च या १५ दिवसांत तब्बल ५६ लाख २५ हजार युनिट वीजनिर्मिती केली आहे. शासन दराप्रमाणे दोन कोटी ८१ लाख २५ हजार किमतीची वीजनिर्मिती झाल्याने सरकारच्या महसुलात भर पडली. जलविद्युत केंद्राचा हा या महिन्यातील उच्चांक म्हणावा लागेल.