

Highway Heist: Sheep Stolen from Moving Truck Recovered Within 24 Hours
Sakal
कळंब : तालुक्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हायवेवरून चालत्या ट्रकमधून चोरीस गेलेल्या सुमारे २ लाख ९ हजार रुपये किंमतीच्या मेंढ्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत शोधून काढत दमदार कामगिरी केली. या कारवाईत मेंढ्यांसह लाल रंगाचे टमटम वाहन असा एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.