

₹3 Crore Government Rest House Remains Uninaugurated in Yermala
Sakal
येरमाळा : येरमाळा हे गाव सोलापूर–धुळे,खामगाव पंढरपूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर वसलेले दहा हजार लोकांवस्तीचे गाव येथील श्री येडेश्वरी देवी मंदिर राज्यासह परराज्यातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे वर्षभर मोठ्या प्रमाणावर भाविक,प्रवासी लोकप्रतिनिधींची ये जा या गावात होत असते. गावातील वाढती रहदारी आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालया मार्फत येरमाळा येथे जुने शासकीय विश्रामगृह पाडून सुमारे तीन कोटी रुपये खर्चून नवीन अत्याधुनिक शासकीय विश्रामगृह उभारन्यासाठी निधी मंजुर झाला होता.