`मास्तर’ तुम्ही तुमचीच इभ्रत...

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यातील शंकरनगर (ता. बिलोली) येथे गुरू-शिष्याच्या परंपरेला काळीमा फासणाऱ्या शिक्षकांना पोलिसांच्या ‘लॉकअपमध्ये’ दिर्घकालीन मुक्काम करावा लागत असतानाच नांदेड शहरातील माळटेकडी येथील प्रबोधन प्राथमीक शाळेतील एका शिक्षकाने विक्षिप्तपणाची हद्द ओलांडली आहे. पालकांनी भरपेट चोप दिल्यानंतर या शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. तोही सध्या पोलिसांच्या ‘लॉकअप’मध्ये आहे. 

भावी पीढी घडविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असलेले गूरुजीच विद्यार्थ्यांचे भवितव्य बिघडवत असून मंदिर म्हणून समजल्या जाणाऱ्या शाळांना ते आपल्या अय्याशीचे अड्डे बनवत आहेत. शंकरनगर (बिलोली) येथील साईबाबा विद्यालयानंतर नांदेडातील माळटेकडी परिसरातील प्रबोधन प्राथमीक शाळेत गुरू - शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्याने नांदेडच्या शैक्षणिक चळवळीचे धींडवडे निघत आहे. समाज मन सुन्न करणाऱ्या या घटनामुळे आदराने पाहिल्या जाणाऱ्या असंख्य शिक्षकाकडे संतापाने व संशयाने पाहिल्या जात आहे. त्यामुळे आपले पाल्य असुरक्षीत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होत आहे. 

शिक्षक रस्ता भरकटू लागले

भावी पीढी घडविणारे शिक्षक नेहमी आदराचे भागिदार ठरलेले आहेत. समाजात त्यांना सन्मान दिला जातो. त्यामुळे शिक्षकांवर हा आदर कायम रहावा ही जबाबदारी असते. पाल्यासोबत पालकांनाही वेळप्रसंगी वाकविणारे शिक्षक रस्ता भरकटू लागले की, त्याची चर्चा होणारच ही बाब अनेकवेळा दिसून आलेली आहे. बरेच शिक्षक या पेश्‍याला अनुरूप असे वर्तन करतात. त्यामुळे सर्वच शिक्षक बेजबाबदार बनले असे म्हणता येणार नाही. मात्र काही शिक्षकांनी या पेशाची इभ्रत वेशीला टांगली आहे. 

शिक्षण क्षेत्र असुरक्षीत

शंकरनगर व माळटेकडी येथील दोन्ही घटनातील आरोपी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य बिघडविण्याचे काम केले. त्यांनी या पवित्र शिक्षण क्षेत्राच्या जागीच आपल्या अय्याशीचे अड्डे तयार केले आहेत. अलीकडेच घडलेल्या या दोन घटनामुळे शिक्षकांचे चेहरे समोर आले आहे. या घटनामुळे शिक्षण क्षेत्र असुरक्षीत झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया समाजमनातून उमटत आहेत. 

शाळांचा कारभारच बेताल होऊन बसला

आज घडीला शाळांचा कारभारच बेताल होऊन बसला आहे. शिक्षक संस्थाचालकांना आणि संस्थाचालक शिक्षण विभागाला जुमानत नाही. अशी परिस्थिती सध्या दिसुन येते. पूर्वी गुरूजी हे पात्र पानटपरी, बार किंवा समाज ज्या बाबीकडे चांगल्या नजरेने पहात नाही. अशा स्थळापासून दूर राहायचे. परंतु आता अशी परिस्थीती राहिलेली नाही. जेथे गुरूजी दिसु नये अशा स्थळावर त्यांचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे गुरूजींना पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. ‘पिंजरा’ चित्रपटाच्या चष्म्यातून गुरूजीना मास्तर या शब्दाचा अलंकार चढविला जात आहे. या बदलास काही बिघडेल शिक्षकांचे वर्तनच कारणीभूत ठरले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com