File Photo
File Photo

तुम्ही वाचाच : असा केला जातेय ‘कोरोना’संशयीतावर उपचार

नांदेड : जगभरात ‘कोरोना’ व्हायरसने आरोग्य यंत्रणाच नव्हे तर ‘जागतीक आरोग्य संघटने’ची तारांबळ उडवून दिली. ज्या देशाने ‘कोरोना’ व्हायरसला जन्म दिला त्या देशालासुद्धा ‘कोरोना’ आजारावर लस अथवा प्रथम औषधोपचार अद्यापही सापडले नाहीत. त्यामुळे ‘कोरोना’ची लागण झालेले रुग्ण व संशयीत रुग्ण म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात येणाऱ्या रुग्णावर नेमका कुठला इलाज केला जात आहे, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभावीक आहे. 

सद्यस्थितीत ‘कोरोना’ व्हायरसची लागण झालेल्या आणि संशयीत रुग्णावर नेमका कुठला इलाज केला जातोय? याबद्दल माहिती जाणून घेण्यापूर्वी कोरोना नेमका काय आजार आहे, हे समजून घेणे आवश्‍यक आहे.  ‘कोरोना’ जंतु हे कोरोना परिवारातील विषाणू आहे. ते श्वसनाचे संसर्गजन्य रोग निर्माण करतात. यापूर्वीचे कोरोना आजार म्हणजे सार्स, मर्स होय हे प्राणिजन्य विषाणू असल्याचे मानले जातात. सर्वप्रथ्म हा आजार चिन मध्यल्या वुहान शहरातील मास बाजारपेठेतील लोकांमध्ये ‘श्वसनाचे विकार दिसून आले. त्यामुळे या आजाराचे उगमस्थान मासे, कोंबड्या, वटवाघुळ आणि साप यांच्यापासून पसरत असल्याचे सांगितले जाते. 

अशी लक्षणे आढळल्यास सावधान

हलका ताप, घसा दुखी, खोकला, अंगदुखी, मरगळ ही सौम्य तर , जोराचा ताप, पिवळा बेडका, छातीमध्ये दुखणे, दम लागणे ही मध्यम लक्षणे तर, श्वसनक्रिया अपयशी, शरीरभर संक्रमण, इतर अवयव निकामी मृत्यु ही कोरोना आजारा बद्दलची तीव्र लक्षणे असल्याचे मानले जात आहेत. त्यामुळे आपल्या आजूबाजूला आणि स्वतःमध्ये सुद्धा यातील काही लक्षणे दिसून येत असतील तर, त्याबद्दल वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

असा सुरु आहे उपचार

‘कोरोना’ आजारावर अद्याप कुठलाही ठोस अशी उपचार पद्धती किंवा लसिकरण उपलब्ध नाही. त्यामुळे लाक्षणीक उपचार, रुग्णास १४ दिवसापर्यंत वेगळ्या पद्धतीने एकांतामध्ये ठेवणे व त्यावर सर्दी, ताप, खोकला अशी काही लक्षणे अढळुन आल्यास त्यानुसार नियमित उपचार करणे, व संतुलित आहार या सोबतच रीअल टाईम पी.सी.आर. विषाणूच्या जनुकीय रचनेची चिकित्सा, घशातील थुंकितील, शरीरातील द्रव्य, या शिवाय लाक्षणिक चाचण्या, रक्तपेशीच्या चाचण्या, छातीचा एक्सरे आणि सी. टी. स्कॅन अशा पद्धतीचा उपचार केला जात आहे. 

अशी घ्या खरबदारी 
कोरोना व्हायरस वयस्क व्यक्तीमध्ये आढळुन येते. सुदैवाने नांदेडात आलेल्या तीन्ही संशयीत रुग्णांपैकी एकालाही ‘कोरोना’ची लक्षणे आढळली नाहीत. अचानक कुठलिही परिस्थिती उद्भवू नये म्हणून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. ज्या रुग्णास संशयीत म्हणून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या आजारासंबंधी लक्षणे बघुन नियमित गोळ्या-औषध दिली जात आहेत. तरी नागरीकांनी हाताची काळजीपूर्वक स्वच्छता ठेवावी, पालेभाज्या व मांसाहार पूर्णपणे शिजवून खावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. 
डॉ. सुरेशसिंह बिसेन (महापालिका आरोग्य विभाग अधिकारी)     
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com