बीड - एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व होमिओपॅथीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने भुल देण्याचे (शरूरकीयेवेळी बधीरीकरण करण्यासाठीचे) इंजेक्शन टोचून घेत जीवन संपविल्याची घटना शनिवारी (ता. २६) समोर आली. डॉ. संजय सोनाजी ढवळे (वय २९, रा. जुजगव्हाण, ता. बीड) असे या तरुण डॉक्टरचे नाव आहे.