लोहा - लोहा तालुक्यातील पिंपळगाव ढगे येथील तरुणाने कोरडा दुष्काळ आणि गरिबी सहन झाली नसल्यामुळे घरात गळफास घेऊन जीवन संपविले. याबाबत पोलीस पाटील आणि पंचनामा करणाऱ्यांनी माहिती दिली..याबाबत मिळालेली माहिती अशी, लोहा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव ढगे येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी केरबा गोविंद डुबुकवाड( वय ३५) गरिबी आणि कोरडा दुष्काळाला कंटाळून गळफास घेतला. याबाबत येथील पोलीस पाटील गजानन हिंगरूपे यांच्या माहितीनुसार केरबा डुबुकवाड यांनी स्वतःच्या घरी गुरुवारी ()ता. १० संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिट दरम्यान गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली..तरुण शेतकरी केरबा डुबुकवाड हे पाऊस पडत नसल्यामुळे विवंचनेत होते. ऐन पोळ्याच्या सणासुदीत पाऊस पडत असल्यामुळे पावसाळा किती राहिला आता पाऊस कधी पडणार काय विकणार आणि आता पुढचे वर्ष कसे खायचे अशी समस्या आपल्या मित्रांना ते बोलून दाखवत असत. पत्नी सविता डुबुकवाड या म्हणाल्या की कर्जबाजारीपणा आणि गरीबीमुळे आलेल्या अडचणी माझ्या पतीला सहन झाल्या नाहीत..वडील गोविंद नंदिराम डुबुकवाड म्हणाले ही घटना कळल्याबरोबर मी लगेच गावातील पोलीस पाटील आणि संबंधित नागरिकांना घटना सांगितली. यावेळी रोकडोजी ढगे,बाबाराव कोचर, रावजी ढगे, कंटीराम ढगे उपस्थित होते पोलीस पाटलासमक्ष पंचनामा करून माझ्या मुलाची उत्तर क्रिया करण्याची परवानगी दिली..मृत केरबा गोविंद डुबुकवाड यांच्या पश्चात पत्नी आई-वडील दोन मुली एक मुलगा असा मोठा परिवार आहे. वय १९ वर्षाची मुलगी दिव्यांग आहे. गरीबी मध्ये कुटुंबांची हावेल ना होत असल्याचे शल्य ते वेळोवेळी बोलून दाखवत असत. त्यांच्यावर पिंपळगाव ढगे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.