बीड : नापिकीमुळे 27 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बीड येथे घ़डली. 

किल्ले धारुर (बीड) : नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. १०) तालुक्यातील कासारी बोडका येथे घडली. सोमनाथ  तिडके (वय २७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतीतील कापूस व सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे पेरणी व लागवडीसाठी झालेले कर्ज कसे फेडायचे अशी त्यांना चिंता होती. यातूनच त्यांनी गळफास लाऊन आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्येची मागील दोन महिन्यांतील ही चौथी घटना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young farmer suicide in beed