Krishna Chavan
sakal
टाकरवण - डांबरीवर भुईमूग लावलाय अन् चुलीत मोटर... आले साहेब, द्या बक्षीस नाहीतर गोळ्या घालीन शेंगदाण्याच्या!" टाकरवणच्या गजबजलेल्या बाजारपेठेत सध्या हे उपरोधिक शब्द घुमत आहेत. निमित्त आहे, बीड जिल्ह्याच्या मातीतून नामशेष होत चाललेल्या बहुरूपी कलेचे.
अंगात पोलिसांची खाकी वर्दी, हातात खेळण्यातील बंदूक आणि तोंडाने शिट्टी वाजवत दुकानागणिक फिरणारा बहुरूपी पाहून बालगोपाळ सुखावत असले, तरी या वर्दीमागे उपासमारीचा ‘पोलिसी खाक्या’ दडलेला आहे.