बीड - मैत्रिणीसोबत कॉफी पित असलेल्या तरुणाला मैत्रीणीचा भाऊ आणि त्याच्या मित्रांनी रॉड, काठी आणि बेल्टने जबर मारहाण केल्याची घटना बीड शहरात घडली. नारायण रमेश बहिर मारहाणीत जखमी झाला. त्याच्या फिर्यादीवरुन चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. जय तांबारे, कार्तिक सोडे व अन्य दोघे अशी आरोपींची नावे आहेत.