गेवराई - आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या यूवकास चार जणांनी कोयता, तलवारीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना परवा रात्री गेवराईच्या संजयनगर भागात घडली.
नईम शेख (वय-२८) रा. गेवराई, जि. बीड हे सोमवारी (ता. २८) आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असताना रात्री आठ वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक कोयता, तलवार या धारधार शस्त्राने वार केले.