Dharashiv Accident : धराशिव येथे ट्रॅव्हल्सच्या डिकीचा पत्रा लागून तरुणाचा मृत्यू
Dharashiv News : ईट तालुक्यात ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिकीचा पत्रा लागून १९ वर्षीय तरुण प्रवीण भोसले याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
ईट (जि.धाराशिव) : ट्रॅव्हल्सच्या उघड्या ठेवलेल्या डिकीचा पत्रा लागल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ईट येथे घडली. प्रवीण शिवाजी भोसले असे तरुणाचे नाव आहे.