भरधाव कारच्या धडकेत तरुण ठार

NND07KJP02.jpg
NND07KJP02.jpg
Updated on

नांदेड : शहरातील कॅनाल रोडवरील चांदोजी पावडे मंगल कार्यालयाजवळ भरधाव वेगातील कारची धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. सात) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाकडून कारची तोडफोड केली.

दर्यापूरचा होता तरुण
नांदेड शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर नांदेड तालुक्यातील दर्यापूर येथील चांदू रघुनाथ सूर्यवंशी (वय २०) हा तरुण शुक्रवारी सकाळी रोडवरुन पायी जात असताना छत्रपती चौकाकडून डीमार्टकडे जाणाऱ्या कारने (एमएच २६- एएफ ३९२) त्याला उडविले. यात चांदू सूर्यवंशी यांना जोराची धडक बसली. तो चेंडु सारखा उडून हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ऑटोवर पडल्याने ऑटोचा चुराडा झाला. या घटनेनंतर कार चालक पोलिस ठाण्यात हजर झाला. धडकेनंतर जमावाने कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. घटनास्थळी भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस दाखल झाले. आहेत  घटनेची माहिती मिळताच दर्यापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

कंटेनर-कार अपघातात दोन जखमी
नांदेड - हैदराबाद महामार्गावर घुंगराळाजवळ (ता. नायगाव) कार व कंटेनरच्या अपघातात चालकासह वैद्यकीय अधिकारी असलेली महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. सात) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली. ही माहिती कुंटूर पोलिसांनी दिली आहे.


काम चालू असल्याने एकेरी वाहतूक
मुंबई येथून आंध्रप्रदेशातील बिचकुंदा येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कारमधून (एम.एच. ०४ जे.एम. ७८६८) चौघेजन जात होते. यावेळी नांदेड ते हैदराबाद महामार्गावरील घुंगराळा ते कुंटूर फाटा दरम्यान पाईपलाईनचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक चालू होती. 

चालकासह महिला गंभीर
या वेळी नरसीकडून नांदेडकडे जाणारा कंटेनर (एम.एच. ४६ ए.आर. ९४४१) आणि नांदेडकडून नरसीकडे जाणाऱ्या कारची धडक झाली. यात कार चालकासह बाजूला बसलेली एक महिला वैद्यकीय अधिकारी गंभीर झखमी झाली. सदरची माहिती समजताच कुंटूर पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडला दाखल केल्याची माहिती कुंटूर पोलिसांनी दिली.

दुचाकी चोरांची टोळी जेरबंद 
शहरातील दुचाकी चोरणारी टोळीचा पर्दाफाश करत पालम (जिल्हा परभणी) शिवारातून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी (ता. सहा) पहाटे केली. 

दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ
नांदेड शहर व जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने चोरट्यांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सक्रीय झाली आहे. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सुचना दिल्या. यावरून श्री. चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांनी गुप्त माहिती काढत आपल्या पथकासह पालम शिवार गाठले. एका शेताच्या आखाड्यावरून तिन दुचाकी चोरट्यांना अटक केली. हे तीन्ही चोरटे अल्पवयीन (विधीसंघर्ष) आहेत. त्यांच्याकडून नऊ दुचाकी जप्त केल्या आहे. या ठिकाणी पकडलेल्या तिघापैकी एका चोराचा मामा राहतो. या तिन्ही चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.
Dramatic Chase in Chhatrapati Sambhajinagar Ends with Safe Rescue of Minor Girl
Marathi News Esakal
www.esakal.com