godavari river paithan
sakal
पैठण - अधिक मासानिमित्त धोंड्याच्या वारीसाठी पैठण संत एकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या एका युवक भाविकाचा येथील जायकवाडी धरणाच्या पायथ्या जवळील गजगड बाबा मंदिराजवळ गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता .१२) दुपारी घडली. अमोल मोहन सावंत (वय-२५, रा. नायगाव खंडेवाडी, ता. पैठण) असे मृत युवकाचे नाव आहे.