भूम - तालुक्यातील पांढरेवाडी येथे एका अठरा वर्षीय तरूणाला प्रेम प्रकरणाच्या कारणावरुन जबर मारहाण झाली असुन, गंभीररित्या जखमी तरुणावर सोलापूर येथील आश्विनी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. सध्या हा तरूण मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी चार आरोपींना पोलीसांनी अटक करण्यात आली असुन परंडा येथील न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, जखमी युवक माऊली बाबासाहेब गिरी (वय-१८) रा. दुधोडी, ता. भुम या तरूणास परंडा तालूक्यातील पांढरेवाडी येथे पाच ते सात जणांनी ३ मार्च रोजी लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत तरूण युवक माऊली गिरी हा गंभीर जखमी झाला होता. यातील आरोपींनी गंभीर जखमी झालेला तरुणास मयत झाला म्हणून पांढरेवाडी ते कोकणे वस्ती शिवारात नग्न अवस्थेत फेकून दिले होते.
नातेवाईकांनी जखमी झालेल्या माऊली गिरी यास तत्काळ रुग्णालयात हलवले. जखमी तरुण सोलापूर येथील अश्वीनी रुग्णालयात अतिदक्षता विभागात मुत्युशी झुंज देत आहे. डॉक्टरानी गॅरंटी दिली नाही, अशी माहिती जखमी माऊलीचे वडील बाबासाहेब गिरी यांनी दिली.
याप्रकरणी ८ मार्च रोजी बाबासाहेब गिरी यांनी अंभी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यातील आरोपी सतीश जगताप (पांढरेवाडी) व इतर पाच ते सहा इसमानी पाढंरेवाडी येथे माऊली गिरी यास मुलीच्या प्रेमप्रकरणातुन लोखंडी रॉड, काठीने मारहाण करुन जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी अंभी पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन, यातील आरोपी सतिश जगताप, राहुल मोहिते दोघे रा. पांढरेवाडी, रा. परंडा, आकाश मगर रा. शेळगाव, ता. परंडा, विजय पाटील रा. सोनारी ता. परंडा अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य आरोपी फरार आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास अंभीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गोरक्ष खरड व पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर घाडगे करीत आहेत.
जखमी माऊली गिरी हा भुम तालुक्यातील दुधोडी येथील रहिवासी असुन, इयत्ता बारावी मध्ये शिकत होता. त्याचे वडील पेढयाचा व्यावसाय करीत आहेत. प्रेमप्रकरणातुन हल्ला झाल्याची पोलीसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.