तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

यादव शिंदे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सोयगाव (जि.औरंगाबाद) ः पळाशी (ता.सोयगाव) येथील महादेव मंदिराच्या धारेश्वर धबधब्यावर आंघोळसाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून कुंडाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.13) उघडकीस आली. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाकी (ता.कन्नड) येथील पाच तरुण पर्यटक पळाशी शिवारातील धारेश्वर धारकुंड येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन धबधब्याच्या प्रवाहात आंघोळीसाठी गेले असता त्यातील अविनाश राजू पवार (वय 18) हा आंघोळीसाठी प्रवाहात उतरूला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा तोल जाऊन पाण्यात बुडाला.

दरम्यान मंगळवारी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगून आल्याचे ग्रामस्थांना आढळून आल्यावरून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुंडात शोधकार्य करून अविनाशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. चिंचोली लिंबाजी (ता.कन्नड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे, जमादार सुभाष पवार, प्रदीप पवार, कौतुक सपकाळ, दीपक पाटील आदी करित आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth drowned in water