बीड जिल्ह्यात सांडव्यात मासे धरण्यासाठी गेलेला युवक वाहून गेला

जवळगाव (ता.अंबाजोगाई, जि.बीड) : मुरंबी लघुसिंचन प्रकल्पाच्या सांडव्यात बेपत्ता युवकाचा शोध घेताना ग्रामस्थ.
जवळगाव (ता.अंबाजोगाई, जि.बीड) : मुरंबी लघुसिंचन प्रकल्पाच्या सांडव्यात बेपत्ता युवकाचा शोध घेताना ग्रामस्थ.

जवळगाव (जि.बीड) : अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्‍यातील मुरंबी लघुसिंचन तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सांडव्यावरून जाणाऱ्या पाण्यात मासे धरण्यासाठी मंगळवारी (ता.३१) सकाळी तिघे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ३७ वर्षीय युवक धर्मराज विठ्ठल गव्हाणे वाहून गेल्याची घटना लघुसिंचन तलावाच्या सांडव्यात सकाळी दहाच्या दरम्यान घडली. मागील आठवड्यातील चार दिवस संततधार पाऊस होता. सोमवारी रात्री या पावसाने(Rain) जोरदार हजेरी लावली. हा पाऊस थांबून, थांबून पडत होता. यामुळे मुरंबी लघुसिंचन तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सांडव्यावरून भरून वाहू लागले आहे, अशा (Beed) वाहत्या पाण्यात मासे पकडण्यासाठी तिघे जण गेले होते.

Rain Updates : हिंगोली वगळता मराठवाड्याच्या ६७ मंडळात अतिवृष्टी

जवळगाव (ता. अंबाजोगाई) येथील धर्मराज विठ्ठल गव्हाणे (वय ३७), अनिल विठ्ठल गव्हाणे (वय ३२) आणि बाबासाहेब प्रभाकर आदमाने (वय २८) हे तिघे तरुण मुरंबी प्रकल्पातील सांडव्यावर मासे पकडण्यासाठी गेले होते. पाण्याचा जोर जास्त असल्याने हे तिघेही तरुण पाण्यात वाहून जाऊ लागले. त्यापैकी अनिल गव्हाणे यांनी गेटला पकडल्याने तर बाबासाहेब आदमाने बाभळीच्या झाडाला अडकल्याने त्यांचा जीव बचावला. या दोघांनाही जवळगाव ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र, धर्मराज गव्हाणे अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. उपस्थित ग्रामस्थ, नातेवाईकांनी त्याचा आरडाओरड करून शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला. बेपत्ता युवकाचा शोध युद्धपातळीवर सुरु असून महसूल आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com