Parbhani Crime News : धारदार शस्त्राने तरुणाचा खून; चार जणांवर गुन्हा दाखल, परभणी शहरातील घटना
Crime News : परभणीत प्रेमसंबंधाच्या वादातून एक तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना जिंतूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे कमानीजवळ शुक्रवारी रात्री घडली असून चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी : मित्रासोबत गप्पा मारत असताना तरुणावर चौघांनी धारदार शस्त्राने व हातोडीने वार करून खून केला. जिंतूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे कमानीजवळ शुक्रवारी (ता. नऊ) रात्री साडेनऊच्या सुमाराम ही घटना घडली.