Simple Wedding : वास्तुशांतीकरिता आले अन् मुलगी देऊन गेले...
Inspiring Story : प्रकाश बिलोरे यांनी केवळ एका तासात, कुठलाही गाजावाजा, हुंडा, डीजे न करता कोमल शिंदे हिच्याशी साधेपणाने विवाह केला. हा विवाह कार्यक्रम घरीच, वास्तुशांतीच्या निमित्ताने जमलेल्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.
कुंभार पिंपळगाव : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पांडुरंग बिलोरे यांनी एक आगळावेगळा एका तासातच अतिशय साध्या पद्धतीने विवाह करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.