Youth Protest : तरुणांचा मंत्रालयावर पायी मोर्चा; ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

Irrigation Scheme Abuse : घनसावंगीतील ग्रामपंचायतीने जल जीवन मिशन, दलित वस्ती सुधार योजना, घरकुल योजना इत्यादीत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप. यासंदर्भात दोन तरुणांनी मंत्रालयावर पायी मोर्चा काढला आहे.
Youth Protest
Youth Protestsakal
Updated on

घनसावंगी (जि. जालना) : तालुक्यातील अंतरवाली दाई ग्रामपंचायतीने जल जीवन मिशन, दलित वस्ती सुधार योजना, घरकुल योजना, अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेसह १५ वा वित्त आयोग, डीपीसीअंतर्गत करण्यात आलेल्या कामांत भ्रष्टाचार करून शासनाचा निधी लाटला आहे. या सर्व कामांची चौकशी करून ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील दोन तरुणांनी मंत्रालयावर (मुंबई) पायी मोर्चा काढत कूच केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com