Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विषारी द्रव प्राशन करून सरकारविरोधात नोंदवला निषेध
Latur News: लातूर जिल्ह्यातील शिंदगी गावातील बळिराम मुळे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत विष प्राशन केले. त्याला उपचारासाठी लातूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अहमदपूर (जि. लातूर) : मराठा आरक्षणासाठी सरकार वेळकाढूपणा करत असल्याचे सांगत तालुक्यातील शिंदगी येथील एका युवकाने मंगळवारी (ता. २६) सायंकाळी पाच वाजता विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.