युवकांचा हात प्रशासनाच्या मदतीला... परभणीतील उपक्रम  

गणेश पांडे
Thursday, 6 August 2020

परभणी योध्दा बनलेल्या युवकांचे काम प्रेरणादायी ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे. युवकांच्या उपक्रमातून प्रशासनास मदत होत आहे.  

परभणी ः कोरोना विषाणु संसर्गामुळे प्रशासनावर कायदा व सुव्यस्थेसह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. महसूल, पोलिस व महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कामामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. शहरातील काही युवकांनी एकत्र येत प्रशासनाला मदत करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. 

कोरोना विषाणु संसर्गामुळे कामाच्या पध्दती बदलल्या आहेत. विषाणुचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने काही बाबींची नागरिकांसाठी सक्ती केली आहे. त्यात तोंडाल मास्क लावणे तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. परंतू, अजूनही लोकांमध्ये म्हणावी तशी जनजागृती होत नसल्याने महापालिकेच्या माध्यमातून लोकांना आर्थिक दंड लावण्याचे आदेश ही देण्यात आले. त्यानंतर कुठे लोकांनी बळजबरीने का होईना मास्क लावण्यास सुरुवात केली. 

युवक - युवतींचा कार्यात सहभाग 
सकाळच्यावेळी बाजारात भाजी, दुध आणण्यासाठी जाणारे नागरिक मास्क लावत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळचे पाच तास प्रशासनातील अधिकारी - कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी ‘परभणी योध्दा’ ही संकल्पना समोर आली. यात महाविद्यालयात शिक्षण घेणारे युवक - युवतींना या कार्यात समाविष्ठ करून घेण्यात आले. आता हे युवक दररोज सकाळी शहरात फिरत असून मास्क न लावणाऱ्यांना समज देत आहेत. तसेच सोशल डिस्टसींगचे पालन केले जात आहे की नाही याची पाहणी करून ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी जावून गर्दी पांगविण्याचे काम केले जात आहे. 

हेही वाचा - महिलांनो सावधान : मोबाईल दुरुस्तीसाठी देत असाल, तर अशी घ्या काळजी...

वर्दळीच्या भागात स्वयंसेवकांचे लक्ष 
परभणी योध्दा म्हणून दररोज सकाळी सहा ते ११ वाजेपर्यंत हे युवक निस्वार्थ भावनेने सेवा देत आहेत. यात ४९ मुले व तीन मुलींचा समावेश आहे. शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क, अष्टभुजा चौक, क्रांती चौक व नारायणचाळ या भागात जास्त वर्दळ व गर्दी असल्याने या भागात या स्वयंसेवकांचे लक्ष असते. 

हेही वाचा - माणुसकीचा ओलावा आटला : चक्क मुख्याधिकाऱ्यांनी दिला, वृध्देच्या प्रेताला खांदा -

दररोज पाच तास सेवा 
गेल्या महिण्याभरापासून हे युवक - युवती आपली निस्वार्थ सेवा देत आहेत. दररोज पाच तास शहरातील दोन नाके व पाच चौकात हे युवक थांबत असतात. त्यांच्यासोबत महापालिकेचे कर्मचारी देखील असतात. 
- सुशिल देशमुख, प्रमुख परभणी योध्दा पथक, परभणी. 

संपादन ः राजन मंगरुळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth's hand in helping the administration ... Activities in Parbhani, parbhani news