स्वच्छते बद्दल काय म्हणाल्या जी. प अध्यक्षा मंगाराणी 

nanded news
nanded news

नांदेड : स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्‍ह्यात शौचालय बांधकामे मोठ्या प्रमाणात करण्‍यात येत आहे. त्यापूर्वीच स्‍वच्‍छता अभियान यशस्‍वी करण्‍यासाठी दृष्टीने सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्‍यावा आणि हे अभियान यशस्वीकरुन दाखवावे असे आवाहन जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना केले आहे.

जिल्‍हा परिषदेच्‍या नवनिर्वाचीत अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी जिल्‍ह्यातील विविध विकास आढावा घेण्यास सुरुवात केली असून, या संदर्भात जिल्‍ह्यात चालू असलेल्‍या विविध विभागांच्या खाते प्रमुख यांच्याकडून आढावा घेण्‍यास सुरवात केली आहे. ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी त्‍यांनी स्‍वच्‍छतेच्‍या कामाकडे अधिक लक्ष देण्‍याची गरज असून, त्या दिशेनी विकास कामे व्हावीत यासाठी गावस्‍तरावर जनजागृती व विविध अभियान हाती घेवून उपक्रम राबविण्‍यात येणार असल्‍याचे जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगीतले.

शौचालय असणे आवश्‍यक ​
सन २०१२ मध्‍ये शौचालय बांधकामासाठी पायाभूत सर्वेक्षण करण्‍यात आले होते. त्‍या सर्वेक्षणातील सर्व शौचालयाच्‍या बांधकामाचे उदिष्‍ट पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणात सुटलेल्‍या लाभार्थ्‍यांना देखील शौचालयाची सुविधा देण्‍यात येत आहे. ही कामे देखील प्रगतीपथावर असून ही कामे वेळेत पूर्ण करण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले आहेत. एप्रिल २०२० पासून जणगणनेच्‍या कामाला सुरवात होणार आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भगातील सर्व कुटूंबांकडे वापरातले शौचालय असणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी सर्व यंत्रणांनी स्‍वच्‍छता अभियानात पुढाकार घेवून शौचालय बांधकाम करण्‍यासाठी नागरिकांना प्रर्वत करावे असे आवाहन त्‍यांनी केले आहे.

अभियानातून गावात स्‍वच्‍छता केली जाणार
स्‍वच्‍छतेच्‍या जनजागृतीसाठी गावस्‍तरावर धार्मीक स्‍थळे, समाज मंदीर, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत व गावस्‍तरावरील सार्वजनिक ठिकाणांसह परिसराची स्‍वच्‍छता करण्‍यावर भर देण्‍यात येणार आहे. यासाठी आठवडयातून एक दिवस गावासाठी या अभियानातून गावात स्‍वच्‍छता केली जाणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या प्रभात फेरी, महिला बचत गटाच्‍या कॉर्नर बैठका, शालयेस्‍तरावर चित्रकला, रांगोळी आदी स्‍पर्धा घेतल्‍या जाणार आहेत. मासिकपाळी व्‍यवस्‍थानासाठी इयत्‍ता आठवी ते बरावीच्‍या विद्यार्थींनींसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती, शिक्षीका व आशा वर्कर यांचा सहभाग घेतला जाणार आहे. तरी गावस्‍तरावर कायम स्‍वच्‍छता राहण्‍यासाठी सर्व यंत्रणांनी सहभागी होऊन स्‍वच्‍छतेचे विशेष अभियाना यशस्‍वी करावे असे आवाहन जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा श्रीमती मंगाराणी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com