Chakur : अहमदपूर-चाकूरच्या दुष्काळमुक्तीसाठी ३,४९१ कोटींची झरी उपसा सिंचन योजना; विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची राज्यपालांकडे मागणी

Zari Lift Irrigation Scheme Proposed for Drought Relief in Ahmedpur and Chakur : अहमदपूर आणि चाकूर तालुक्यांतील दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी झरी उपसा सिंचन योजनेला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. सुधारित प्रकल्पासाठी ३,४९१.६८ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्यपालांकडे मांडण्यात आला आहे.
Zari Lift Irrigation Scheme Proposed for Drought Relief in Ahmedpur and Chakur

Zari Lift Irrigation Scheme Proposed for Drought Relief in Ahmedpur and Chakur

esakal

Updated on: 

चाकूर : चाकूर आणि अहमदपूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना वारंवार भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या संकटातून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी प्रस्तावित झरी साठवण तलाव उपसा सिंचन योजनेला विशेष बाब म्हणून मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडे केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा ४,३२१ कोटी रुपयांचा मूळ प्रस्ताव सुधारित करून ३,४९१.६८ कोटी रुपयांपर्यंत आणण्यात आला असून, त्याला तातडीने मंजुरी मिळावी, यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

Loading content, please wait...