Electric Shock : भिलदरी येथे वीजेचा धक्का लागून झिरो वायरमनचा मृत्यू

लाईन दुरुस्तीच्या कामासाठी लाईनमनसोबत गेलेल्या ५५ वर्षीय झिरो वायरमनचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
Krishna Mokase

Krishna Mokase

sakal

Updated on: 

कन्नड - तालुक्यातील भिलदरी येथे लाईन दुरुस्तीच्या कामासाठी लाईनमनसोबत गेलेल्या शफेपूर येथील ५५ वर्षीय झिरो वायरमनचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. कृष्णा काळूबा मोकासे (वय ५५, रा. शफेपूर, ता. कन्नड) असे मृत्यू झालेल्या झिरो वायरमनचे नाव आहे. या घटनेने शफेपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com