

हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी मार्गावर पिकअप वाहन व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १६) रात्री घडली. अशोक कामाजी खोकले (५०) असे मयताचे नाव असून, ते हिंगोली जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात सहायक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते.