जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब

photo
photo
Updated on

नांदेड : राज्याप्रमाणे जिल्ह्यातही महाविकास आघाडीवर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. १७) शिक्कामोर्तब केले. मंगळवारी (ता.२१) होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह विषय समित्यांचे सभापतीपद निवडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विश्रामगृहामध्ये महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा स्वतंत्र बैठकांद्वारे आढावा घेतला.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया मंगळवारी होणार आहे. जिल्हा परिषदेतही आता महाविकास आघाडीचा प्रयोग होणार असल्याने शुक्रवारी (ता.१७) पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांचा विश्रामगृहामध्ये स्वतंत्र बैठकीद्वारे आढावा घेतला. राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक, शंकरअण्णा धोंडगे, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार सुभाष साबणे, नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते दिलीप बास्टेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

घटक पक्षांच्या स्वतंत्र बैठका 
संख्याबळामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह दोन विषय समित्यांचा कारभार काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला उपाध्यक्षपदासह दोन विषय समित्यांची सत्ता असली तरी आता शिवसेनेची भर पडल्याने सत्ताधारी पक्षांतील वाटा शिवसेनेला द्यावा लागणार आहे. त्यानुसार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा स्वतंत्र बैठकाद्वारे शुक्रवारी प्रतिक्रिया जाणून घेतल्या. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आमदार भाई जगताप, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार रावसाहेब अंतापूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार वसंत चव्हाण, हणमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांची उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक, शंकरअण्णा धोंडगे, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार सुभाष साबणे, नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकारी सदस्यांची उपस्थिती होती.

काँग्रेस बहुमताच्य उंबरठ्यावर 
पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठकीद्वारे मते जाणून घेत कारभारी निवडीचा अंतिम निर्णय सोमवारी (ता. २०) जाहीर करण्याचे संकेत दिले. संख्याबळाच्या गोळा बेरजेनुसार काँग्रेस २८, राष्ट्रवादी दहा (त्यापैकी माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर गटाचे चार), शिवसेना दहा (त्यापैकी खासदार प्रताप पाटील चिखलीकर गटाचे चार) तर भाजप १३ तसेच रासप एक व अपक्ष मिळून दोन असे संख्याबळ आहे. यापैकी रासप व एक अपक्षाने कॉँग्रेसला पाठिंबा दिल्याने तीसच्या संख्याबळानुसार काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यावर आहे.

घटक पक्षात चुरस 
राष्ट्रवादीचे माजी आमदार नाईक व धोंडगे यांनी राष्ट्रवादीचे संख्याबळ कायम राहणार असून उपाध्यक्षपदासह एका विषय समितीवर दावा केला आहे. मात्र, शिवसेनेने सावध पवित्रा घेत संख्याबळानुसार एक विषय समितीचा आग्रह धरला आहे. काँग्रेसकडून अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदासह दोन विषय समित्यावर दावा करण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत ऐच्छिक पदांवरुन महाविकास आघाडीच्या घटक पक्षांत चुरस निर्माण झाली आहे.

येथे क्लिक करुन पहा.....कार्यकारी समिती करणार विकासाचे नियोजन ​
राष्ट्रवादीचे संख्याबळ कायम
महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे पण माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर गटाचे दोन सदस्य उपस्थित होते. दरम्यान इतर दोन सदस्यांनीही भ्रमणध्वनीवरुन सत्तेत सहभागी असल्याचा खुलासा दिल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ कायम असल्याचा दावा गटनेते समाधान जाधव यांच्याकडून करण्यात येत आहे.

.... तर राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा
संख्याबळापेक्षा महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीकडून उपाध्यक्षासह एका सभापती पदावर दावा करण्यात येत आहे. ही दोन पदे मिळणार असतील तरच तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असला तरी सोमवारी अंतिम निर्णय जाहीर होणार असून मागितलेल्या पदापासून डावलण्यात आले तर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी प्रसंगी बाहेरुन पाठिंब्याचा विचार करेल, अशी भावना राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhokardan Theft
The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.
Marathi News Esakal
www.esakal.com