ZP School Success: कॉन्व्हेंटच्या ४० विद्यार्थ्यांची ‘झेडपी’कडे धाव; गुगुळपिंपरीच्या जिल्हा परिषद शाळेची धमाल कामगिरी
Rural Education: हिंगोली जिल्ह्यातील गुगूळपिंपरी येथील जिल्हा परिषद शाळा दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून परिसरातील इंग्रजी कॉन्व्हेंट शाळांपेक्षा पुढे गेली आहे. त्यामुळे ४० विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून या शाळेत प्रवेश घेतला आहे.
हिंगोली : जिल्ह्यातील गुगूळपिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेने आदर्श शाळेचा एक परिपाठ घालून दिला. शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल ठरलेल्या या शाळेत परिसरातील गावांमधील कॉन्व्हेंटचे विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले.