
पुणे : यश नाहर (८२ धावा), ऋषिकेश सोनावणे (५८ धावा), सूरज शिंदे (नाबाद ४०) यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीसह निकित धुमाळ (५-३९) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ४ एस पुणेरी बाप्पा संघाने रायगड रॉयल्स संघाचा ९९ धावांनी पराभव करीत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ४ एस पुणेरी बाप्पा संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.