
पुणे : डावखुरा फिरकी गोलंदाज प्रशांत सोळंकीचा प्रभावी मारा (४/१३) आणि अर्शिन कुलकर्णी याची दमदार अष्टपैलू खेळी (४२ धावा व २/२७) याच जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघावर चार विकेट राखून मात केली. ईगल नाशिक टायटन्स संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला.