MPL 2025 : सोलापूर स्मॅशर्स संघाची घोडदौड कायम; महाराष्ट्र प्रीमियर लीग : ईश्वरी सावकार, हसबनीस विजयाचे शिल्पकार
Solapur Smashers : ईश्वरी सावकार (७५*) आणि तेजल हसबनीस (७०) यांच्या तडाखेबंद खेळीमुळे सोलापूर स्मॅशर्सने रत्नागिरी जेट्सवर १९ धावांनी विजय मिळवला. दोघींनी १३० धावांची विक्रमी भागीदारी करत सामन्यावर वर्चस्व गाजवलं.
पुणे : ईश्वरी सावकार (नाबाद ७५ धावा), तेजल हसबनीस (७० धावा) यांनी केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर सोलापूर स्मॅशर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा १९ धावांनी पराभव करत आपली घोडदौड कायम राखली.