पुणे, १३ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2025 स्पर्धेत १२व्या लढतीत फिरकीपटू विकी ओस्तवाल(४-१७)च्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने ४एस पुणेरी बाप्पा संघाचा २ गडी राखून पराभव करत तिसऱ्या विजयाची नोंद केली.