
पुणे : पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघावर सात विकेट राखून दमदार विजय संपादन केला. आत्मन पोरे (३-२९) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह अंकित बावणे (५१ धावा), सचिन धस (३५ धावा), सिद्धार्थ म्हात्रे (नाबाद ३५ धावा), राहुल त्रिपाठी (३२ धावा) यांनी केलेली धडाकेबाज फलंदाजी कोल्हापूर टस्कर्स संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) ही प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू आहे.