
पुणे : समृद्धी डाळे (नाबाद १० धावा, २/१८) हिने केलेल्या शानदार अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने सलग चौथ्या विजयाला गवसणी घातली. या दमदार विजयासह पुणे वॉरियर्स संघाने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने अदाणी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्ल्यूएमपीएल) ही प्रतिष्ठेची स्पर्धा सुरु आहे.