
पुणे : कर्णधार राहुल त्रिपाठी (५३ धावा) याने केलेल्या सुरेख फलंदाजीसह आनंद ठेंगे (४-२९) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा दोन विकेट राखून पराभव केला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) या मानाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.