वकिल मॅडम म्हणतात, "थोडा ब्रेक हवाच होता...'

ऍड. दीपा सकळे
गुरुवार, 16 एप्रिल 2020

काळा कोट घालून कोर्टात खटले लढणाऱ्या ऍड. दीपा सकळे यांच्या प्रतिभेला लॉकडाऊन काळात धुमारे फुटले.

काळा कोट घालून कोर्टात खटले लढणाऱ्या ऍड. दीपा सकळे यांच्या प्रतिभेला लॉकडाऊन काळात धुमारे फुटले. घरी कामवाल्या बाईंना सुटी दिली आणि सारी कामे अंगावर आली. धुणे, भांडी, स्वयंपाक, स्वच्छता सारं-सारं... त्यातील आपली प्रतिभा उजळून टाकतानाच मग त्यांनी एक कविता लिहली.

थोडा ब्रेक हवाच होता. हा ब्रेक किती काळ वाढणार, याची कल्पना नाही, मात्र संकटाचे ढग दाटलेले असताना एक मोकळा श्‍वासही माणूस घेतो आहे, कुटुंबासोबत रमतो आहे, जगण्यासाठी इतकी धावपळ खरंच गरजेची होती का, याची उकल करतो आहे. त्यातील घुसमट ऍड. दीपा सकळे यांनी कवितेतून मांडलीय.

थोडा ब्रेक हवाच होता
रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांना
घुसमटलेल्या मनांना
जगणं विसरलेल्या जगाला
आणि थांडवलेल्या जाणिवांना

आला करोना कुठून कसा
जाणूनबुजून की स्वतःहून
आला तसा, थांबली चाके
झोपले रस्ते, वळले पाय
घरांकडे आपल्या आपल्या

थांबूनही थांबलं नसता
घर काय विसरला असता
जर हा ब्रेक मिळाला नसता
प्रत्येक श्वास गुदमरला अस्ता

पक्षी प्राणी दिसले नसते
चिमण्या कावळे हसले नसते
निसर्गाच्या देण्याला शेवटी
काही उरले नसते

सोशली जगणाऱ्या
काट्यावर चालणाऱ्या
काहीतरी हरवलेल्या
प्रत्येकाला आजचा हा
ब्रेक हवा होता

निसर्गाशी मस्ती नको
जमिनीवर असावेत पाय
म्हणूनच की काय
आजचा ब्रेक हवा होता

प्रत्येकाला वाटत असेल
कारोनाला जात नाही
त्याला धर्म ही माहीत नाही
पैशाचा माज नाही
तरी सांगून जात आहे
जगायचं असेल तर
माणुसकी ठेवा म्हणूनच की
काय आजचा ब्रेक हवा होता

- ऍड. दीपा सकळे, सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: advocate madam says its much needed breck

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: