हिंदूस्थान सुंदर आहे; हिंदुस्थानी नसते तर...

अशोक इंदलकर
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

श्रावणी सोमवार निमित्त नुकताच भिमाशंकरला जाण्याचा योग आला. श्रावणी सोमवारला विविध वाहनांमधून लाखो भावीक येथे गर्दी करताना दिसतात. साधारण 50 हजाराहून अधिक वाहने येथे येतात. लाख दोन लाख तर कधी त्याहून अधिक भाविक भेटी देताना दिसतात. 12 जोतिर्लिंगां पैकी एक असलेल्या भिमाशंकर देवस्थान हे अतीशय पौराणिक असे देवस्थान समजले जाते. त्यामुळे भाविकांची येथे नेहमीच वर्दळ पहायला मिळते.

श्रावणी सोमवार निमित्त नुकताच भिमाशंकरला जाण्याचा योग आला. श्रावणी सोमवारला विविध वाहनांमधून लाखो भावीक येथे गर्दी करताना दिसतात. साधारण 50 हजाराहून अधिक वाहने येथे येतात. लाख दोन लाख तर कधी त्याहून अधिक भाविक भेटी देताना दिसतात. 12 जोतिर्लिंगां पैकी एक असलेल्या भिमाशंकर देवस्थान हे अतीशय पौराणिक असे देवस्थान समजले जाते. त्यामुळे भाविकांची येथे नेहमीच वर्दळ पहायला मिळते.

दरवर्षी श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने येतात. भारतातील कुठल्याही धार्मिक स्थळाचे जे वाटोळे करतात त्या प्रमाणे भिमाशंकर अभयारण्याचा नयनरम्य परिसराचे झाले आहे. घाणीने, फ्लॅस्टीक बाटल्यांनी, खादाडी खाऊन अस्ताव्यस्त फेकून दिलेल्या कागदांच्या भेंडोळयांनी गलीच्छ करून टाकला होता. ते कमी का काय म्हणून अनेक ठिकाणी उघडयावर शौचालय केल्याचे दिसत होते. देवदर्शन घेऊन नाकाला रुमाल लावत मी पोलिस जीप मध्ये बसून बाहेर पडलो. भिमाशंकर मंदीरा जवळच एक उंच किर्र झाडीत आच्छादलेली अशी टेकडी आहे. त्या टेकडीवर टूमदार असे छोटेखानी रेस्ट हाऊस आहे. ब्रिटीशांनी बांधलेले सुंदर असे कलोनीयल स्टाईल रेस्ट हाऊस आहे. चालकाला तिकडे गाडी घेण्यास सांगितले. चिखलातील रस्त्याने कसरत करत गाडी कशीबशी वरती गेली एकदाची.... आणि ज्या क्षणी रेस्ट हाऊसच्या सुंदर परिसरात आलो तेव्हा आजूबाजूच्या उत्तुंग सुळक्यांचे व जंगल परिसराचे विहंगमय दृष्य पाहुन मन तृप्त झाले.

भिमाशंकर अभयारण्याचा परिसर, त्या ठिकाणी पाणवठयावर येणाऱ्या जंगली प्राण्यांबाबत खूप छान माहिती तेथील खाण सामा असणाऱ्या इनामदारने सांगितली. ब्रिटीशांनी 192O च्या दरम्यान बांधलेले ट्मदार रेस्ट हाऊस आता वन खात्याने सुधारीत केले आहे. त्याबाबत खूप छान किस्सा त्याने सांगितला, 'दैनिक 'सकाळ' मध्ये मी वाचल्याचेही मला आठवले. तो म्हणाला, शरद पवार हे पूर्वी पुलोद मध्ये असताना एक दिवस वस्तीला या डाक बंगल्यावर होते. झोपेत मध्यरात्री त्यांच्या अंगावरन काहीतरी वळवळत गेले. ते दचकून उठून बसले. बघतात तर काळा नाग होता. ही घटणा स्थानिकांना व त्यावेळचे स्थानिक नेते दतात्रेय वळसे पाटील यांना समजताच त्या घटणेचे गर्भीतार्थ समजून स्थानिकांनी साहेबांच अभिनंदन केले. भिमाशंकर मंदीरात मोठी पुजा बांधून निरगुडसर (मंचर) येथे जेवणावळी झडल्या. पवारसाहेबांना काही बोध होईना. पण मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.'

ब्रिटीशकालीन रेस्ट हाऊस समोर उभे राहून एका वनविभागाच्या अधिकाऱ्यासोबत छायाचित्र काढून घेण्याचा मोह आवरला नाही. मोबाईलमधून डाक बंगल्याच्या खाण साम्याला व्यवस्थीत घेता आला नाही. परंतू, तो जुना डाक बंगला आणि श्रावणसरीत चिंब झालेल्या किर्र झाडीचा तो हवेशीर परीसर पाहून मन प्रसन्न झाले. भाविकांनी मंदीर परीसरात केलेली घाण पाहून मन विटले होते! एका इंग्रज महिलेने काढलेले उदगार वाचल्याचे आठवले. ती म्हणाली होती, हिंदूस्थान सुंदर आहे. हिंदुस्थानी नसते तर तो अधिक सुंदर झाला असता...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashok indalkar write article in muktapeeth