पुस्तके माझी सांगाती

muktapeeth
muktapeeth

पुस्तकांच्या भिंतीचा मनाला आधार मिळतो, आत कुठे तरी समाधान मिळते.

आयुष्यात गुरू असावा, याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. मला मात्र गुरू शोधण्यापेक्षा पुस्तकात रमणे अधिक आवडते. पुस्तके हेच माझे गुरू आहेत. पुस्तके मला दिशा दाखवतात आणि माझी मनोवृत्तीही बदलतात. सकारात्मकतेकडे नेतात. आता हेच पाहा -

माझा मित्र शिरीष त्याच्या बायकोला विविध पदार्थ येत नाहीत म्हणून वहिनींना सतत नावे ठेवायचा. तीच ती भाजी-पोळी. शेजारीच त्याचे घर असल्याने तो नेहमीच असे बोलायचा. मी एक पुस्तक घेऊन गेलो. पाकक्रियांवरील पुस्तक वहिनींना दिले. म्हटले, यात रेसीपीज आहेत. शिका व उपयोग करा. परिणाम झालाच. शिरीषला जेवणात "व्हरायटी' मिळू लागली. आता शिरीषचा आवाज बंद झाला आणि वहिनींची नाराजीही पळून गेली. हा प्रताप केवळ पुस्तकाचा होता. आमच्या चाळीत नाडकर्णी कुटुंब होते. दोन घरे सोडून ते राहात. नाडकर्णीकाकू कधी मनापासून दाद देत नसत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नावाचा प्रकार नव्हता. एरवी सर्व कार्यक्रमांत त्या अग्रेसर असायच्या. मात्र, मरतूक चेहऱ्याने. प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून मी पु. ल. देशपांडे यांचे "व्यक्ती आणि वल्ली' पुस्तक नाडकर्णी वहिनींना वाचायला दिले. दोन दिवसांनी त्यांच्या घरी गेलो, तर नाडकर्णी वहिनी चक्क हसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून पुस्तकाने आपले काम केलेले दिसले. त्यांनी हसतच पुस्तकातील व्यक्तींचे स्वभाव सांगितले व अजून पुलंची पुस्तके मागितली. हे उदाहरण दाखल नमुने दिले होते. खरेच! एकटेपणा घालविणारे, हसविणारे, रडविणारे हे माझे सांगाती आहेत. आपले आयुष्य एकच असते, अनुभव तेवढाच येतो. दहा जणांचे अनुभव वाचले, तर एकाच आयुष्यात दहा आयुष्यांचा अनुभव घेतल्यासारखे असते. म्हणून तर माझ्या संग्रहात पुस्तकांची संख्या वाढतच आहे. पुस्तकांच्या भिंतीचा मनाला आधार मिळतो, आत कुठे तरी समाधान मिळते. अजून काय हवंय! ग्रंथ माझे गुरू, ग्रंथ माझे तारू, नेती पैलतीरू, ग्रंथ माझे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com